एक जानेवारीपासून शेगावमध्ये सुरू होतेय अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण

१८ दिवसांचे निःशुल्क निवासी शिबिर घडवणार कौशल्यवान उमेदवार

एक जानेवारीपासून शेगावमध्ये सुरू होतेय अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण मुख्य फोटो
एक जानेवारीपासून शेगावमध्ये सुरू होतेय अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण अतिरिक्त फोटो

बुलढाणा : अमृत अर्थात महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे १८ दिवसांचे निःशुल्क निवासी सोलर पॅनेल दुरुस्ती व देखभाल प्रशिक्षण एक जानेवारी २०२६पासून सुरू होत आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

हरित ऊर्जेच्या क्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेऊन युवकांना रोजगारक्षम व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने हे अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना सोलर पॅनेलची दुरुस्ती, देखभाल, इन्स्टॉलेशन, तसेच टेंडरिंग प्रक्रियेचे सखोल सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण काळात औद्योगिक प्रशिक्षण, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि सोलर क्षेत्रातील अनुभवी उद्योजकांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात येणार असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहभागी उमेदवार स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील, अशा प्रकारे त्यांना पूर्णपणे सक्षम करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणार्थींकरिता नाश्ता, जेवण, चहा व निवासाची उत्कृष्ट व पूर्णपणे मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष भेट देऊन अथवा फोनवरून संपर्क साधून सविस्तर माहिती घ्यावी, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला (TC), उत्पन्न दाखला, अधिवास (डोमिसाइल) दाखला, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो

पत्ता :
फ्लॅट नं. ३०५, तिसरा मजला,
बुलढाणा प्राइड बिल्डिंग,
तहसील कार्यालयासमोर, बुलढाणा
मोबाइल :
9112227637, 8308989222
जिग्नेश कमानी, बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 28-12-2025 News publication date | Time: 10:46 PM News publication time | Views: 269 Number of times this news has been viewed | District: buldhana Related district of the news
Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 28-12-2025 News publication date | Time: 10:46 PM News publication time | Views: 269 Number of times this news has been viewed | District: buldhana Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words