'अमृत'तर्फे नांदेड येथे १० दिवसीय EDP प्रशिक्षण पूर्ण; प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण
'अमृत'तर्फे नांदेड येथे १० दिवसीय EDP प्रशिक्षण पूर्ण; प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण
नांदेड: 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) संस्थेच्या वतीने नांदेड येथे आयोजित १० दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रमाचा (EDP) समारोप व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास अमृतचे विभागीय उपव्यवस्थापक श्री. ओमकार शेटे, नांदेड जिल्हा व्यवस्थापक श्री. सौरभ माळहिप्परगेकर व उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थींना अधिकृत प्रमाणपत्रे प्रदान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
१० दिवसीय प्रशिक्षणात सहभागी नवउद्योजकांना व्यवसाय नियोजन, भांडवल व्यवस्थापन, शासकीय योजना व विपणन (मार्केटिंग) याबाबत तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन मिळाले. युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग उभारावा व स्वयंरोजगाराकडे वळावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री.सौरभ माळहिप्परगेकर यांनी केले.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७२
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 2 Comments
Ravindra Narangwade
very nice program for needed ews so Latur office address difine me
Nilesh Ragunath Deshpande
Amrut is society for open category amrut keep 1) drown payalat training 2) bekary traing and diffrent educational program I hope economical lone frome u thanku best of luck
Write a Comment