हिंदू समाज संस्थेच्या श्री रामचंद्र किनगावकर प्राथमिक शाळेत ‘अमृत पराक्रम दिना’निमित्त
इतिहास तज्ज्ञ जगन्नाथ लडकत यांनी विद्यार्थ्यांना व्याख्यान दिले .
हिंदू समाज संस्थेच्या श्री रामचंद्र किनगावकर प्राथमिक शाळेत ‘अमृत पराक्रम दिना’निमित्त व्याख्यान इतिहास तज्ज्ञ जगन्नाथ लडकत यांनी विद्यार्थ्यांना दिली श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांच्या शौर्याची, पराक्रमाची व राष्ट्रनिष्ठेची माहिती जालना : इतिहासातील पराक्रमी योद्ध्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन धाडस, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिष्ठा आत्मसात करण्याचा संदेश इतिहास तज्ज्ञ व अभ्यासक मा. जगन्नाथ लडकत यांनी विद्यार्थ्यांना दिला. हिंदू समाज संस्थेच्या श्री रामचंद्र किनगावकर प्राथमिक शाळेत महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘अमृत पराक्रम दिना’निमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या अमृतच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभर ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध राज्यस्तरीय स्पर्धा तसेच व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा इतिहास, त्यांचे शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेची माहिती नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. यावेळी इतिहास तज्ज्ञ व अभ्यासक मा. जगन्नाथ लडकत यांनी विद्यार्थ्यांना श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनातील विविध महत्त्वपूर्ण प्रसंगांची माहिती दिली. बाजीराव पेशव्यांनी आपल्या धाडसाने, वेगवान युद्धनीतीने आणि प्रभावी नेतृत्वाने अनेक लढायांमध्ये मिळविलेल्या विजयांची माहिती विद्यार्थ्यांना सोप्या व रंजक पद्धतीने सांगण्यात आली. विशेषतः पालखेडच्या ऐतिहासिक युद्धातील त्यांची युद्धनीती, नियोजन आणि पराक्रम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बाजीराव पेशव्यांचा इतिहास हा केवळ युद्ध आणि विजयांचा इतिहास नसून, त्यामागे असलेली धाडसी निर्णयक्षमता, नेतृत्व, नियोजन आणि राष्ट्रासाठी कार्य करण्याची जिद्द आजच्या पिढीने समजून घेणे गरजेचे आहे, असे लडकत यांनी सांगितले. इतिहास हा केवळ पुस्तकात वाचण्यासाठी नसतो, तर इतिहासातील पराक्रमी व्यक्तिमत्त्वांच्या जीवनातून प्रेरणा घेण्यासाठी असतो, हा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘अमृत पराक्रम दिना’च्या माध्यमातून थोरले बाजीराव पेशव्यांच्या शौर्याची, पराक्रमाची आणि राष्ट्रनिष्ठेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमास महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)चे राज्य व्यवस्थापक श्री. दीपक जोशी, जालना जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे, हिंदू समाज संस्थेचे पदाधिकारी नितीन जी. कोळेश्वर, शाळेच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम तसेच शाळेतील आठवी, नववी व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क- ९१३०२८३०५८
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment