डोंबिवली येथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. प्रमाणपत्र मिळाल्याने प्रशिक्षणार्थींमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वास आणि उत्साह निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेतर्फे आयोजित उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी अमृत संस्थेचे अधिकारी, प्रशिक्षक तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रशिक्षक अमर इखे सरांनी प्रशिक्षणातून कौशल्य, कौशल्यातून उद्योग आणि उद्योगातून स्वावलंबन असे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना केले . तसेच महेश फडणीस सरांनी 'योग्य बँकिंग नियोजन, योग्य कर्ज आणि वेळेवर परतफेड यामुळे व्यवसायाची आर्थिक पायाभरणी मजबूत कशी होते' ह्या विषयावर मार्गदर्शन केले.
डोंबिवली येथील आयोजित कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. प्रमाणपत्र मिळाल्याने प्रशिक्षणार्थींमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वास आणि उत्साह निर्माण झाला.
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा आणि नवी दिशा मिळाली. हे प्रशिक्षण आमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी असे प्रशिक्षणार्थींनी आपले मत व्यक्त केले .
अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२६५३३
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment