छत्रपती संभाजीनगर येथील श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेत अमृत पराक्रम दिनाची माहिती

छत्रपती संभाजीनगर येथील श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला येथे पर्यवेक्षक सौ. सविता पवार मॅडम यांची भेट घेऊन अमृत पराक्रम दिनाची माहिती देण्यात आली. यावेळी विविध स्पर्धांची माहिती तसेच अमृत वर्गाची संकल्पना व अमृत संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. विद्यार्थिनींनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर येथील श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेत अमृत पराक्रम दिनाची माहिती मुख्य फोटो
मुख्य फोटो

छत्रपती संभाजीनगर : येथील श्री शारदा मंदिर, कन्या प्रशाला येथे आज पर्यवेक्षक सौ. सविता पवार मॅडम यांची भेट घेऊन अमृत पराक्रम दिनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी अमृत पराक्रम दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांची माहिती विद्यार्थिनी व शाळा प्रशासनाला देण्यात आली. तसेच अमृत वर्गाची संकल्पना, उद्दिष्टे आणि अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही देण्यात आली.

विद्यार्थिनींनी या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. अमृत पराक्रम दिनाच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७५



अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 11-08-2026 News publication date | Time: 11:46 AM News publication time | Views: 22 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 11-08-2026 News publication date | Time: 11:46 AM News publication time | Views: 22 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement