'अमृत' योजनेच्या साथीने वैरागच्या स्वाती सुमंत यांनी उभा केला यशस्विन वॉटर सप्लाय व्यवसाय; 'एस. एस. एंटरप्रायझेस'द्वारे ग्राहकांना देतात उत्तम सेवा !
सोलापूर मधील 'अमृत' योजनेच्या बळावर वैरागच्या स्वाती सुमंत यांनी उभा केला यशस्विन वॉटर सप्लाय व्यवसाय; 'एस. एस. एंटरप्रायझेस'द्वारे ग्राहकांना देतात उत्तम सेवा! वैराग: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ('अमृत') संस्थेच्या कल्याणकारी योजनांमुळे ग्रामीण व शहरी भागातील नवउद्योजकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मोठे बळ मिळत आहे. 'अमृत' संस्थेच्या 'वैयक्तिक व्याज परतावा योजने'चा लाभ घेऊन वैराग येथील श्रीमती स्वाती उदयकुमार सुमंत यांनी स्वतःचा 'एस. एस. एंटरप्रायझेस' (S. S. Enterprises) हा वॉटर सप्लायरचा व्यवसाय यशस्वीरीत्या सुरू केला आहे. स्वाती सुमंत यांनी 'अमृत' योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळवून व्यवसायाची भक्कम पायाभरणी केली. आज 'एस. एस. एंटरप्रायझेस'च्या माध्यमातून त्या 'सोमानीज मोतीरिच ॲक्वा' (Somani's Motirich Aqua) या मिनरल वॉटरचे वैराग व आसपासच्या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर वितरण करत आहेत. यामध्ये २० लिटर जार, कूल कॅन, तसेच २ लिटर, १ लिटर, ५०० मि.ली. आणि २०० मि.ली. च्या बाटल्यांचा सुरळीत व तत्पर पुरवठा केला जात आहे. त्यांच्या या व्यवसायाला परिसरातून अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळत असून, गुणवत्तापूर्ण सेवा व वेळेवर पुरवठा यामुळे 'एस. एस. एंटरप्रायझेस'ने अल्पावधीतच ग्राहकांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. 'अमृत' संस्थेच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेमुळेच स्वतःचा उद्योग उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे सांगत स्वाती सुमंत यांनी अमृतचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. स्वाती सुमंत यांचे हे यश इतर महिला आणि नवउद्योजकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- अमृत (AMRUT) जिल्हा कार्यालय, १०८-ए, श्री साई बिल्डिंग, तिसरा मजला, यतिराज हॉटेलजवळ, सात रस्ता, सोलापूर - ४१३००१. फोन नंबर- ९११२२२८७६८
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment