कन्नड ग्रामीण तालुक्यात अमृत योजनांची विद्यार्थी आणि स्थानिकांना माहिती

अमृतच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थी, शिक्षक व समाजबांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा उपव्यवस्थापक योगेश भास्करराव रोडे यांनी कन्नड ग्रामीण तालुक्यात विविध ठिकाणी भेटी व बैठका घेतल्या.

कन्नड ग्रामीण तालुक्यात अमृत योजनांची विद्यार्थी आणि स्थानिकांना माहिती  मुख्य फोटो
कन्नड ग्रामीण तालुक्यात अमृत योजनांची विद्यार्थी आणि स्थानिकांना माहिती  अतिरिक्त फोटो

कन्नड ग्रामीण तालुक्यात अमृत योजनांचा जनजागृती दौरा. सिल्लोड : अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती समाजातील नागरिक, विद्यार्थी व शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा उपव्यवस्थापक योगेश भास्करराव रोडे यांनी सोमवारी (ता. १०) कन्नड ग्रामीण तालुक्यात विविध ठिकाणी भेटी व बैठका घेतल्या. सिल्लोड-कन्नड ग्रामीण प्रवासादरम्यान भराडी येथील सरस्वती भुवन विद्यालयाला भेट देऊन मुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी अमृतच्या विविध योजना, अमृतवर्ग आणि पराक्रम दिनाची माहिती देण्यात आली. शाळेत सुमारे ८०० विद्यार्थी असून विद्यार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी शिक्षकांच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे कोठावदे यांनी सांगितले. तसेच इंदुरकर सर यांना अमृतवर्गाच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली. वासडी येथील जिल्हा परिषद शाळेत नव्याने अमृतवर्ग सुरू करण्यात आला. शिक्षिका श्रीमती सोनार यांना अमृतवर्गाची कार्यपद्धती समजावून सांगून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनी अमृतवर्ग घेण्याची तयारी दर्शविली. यानंतर पिशोर येथे दिलीप उपाध्ये यांच्या निवासस्थानी समाजातील मान्यवरांची बैठक घेण्यात आली. सायंकाळी नाचनवेल येथे श्रीकांत पिंपळे यांच्या निवासस्थानी समाजातील प्रमुख व्यक्तींची बैठक झाली. या बैठकीत पराक्रम दिन, अमृतवर्ग, वैयक्तिक व्याज परतावा योजना, अमृत ईडीपी प्रशिक्षण, अमृत सूर्य मित्र, ईव्ही चार्जिंग स्टेशन, कचरा व्यवस्थापन, आयात-निर्यात व शैक्षणिक योजनांची माहिती देण्यात आली. अमृतच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजातील सर्व समाजबांधवांची लवकरच मोठी बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.


अधिक माहितीसाठी संपर्क- ९४०३२००६०६

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: योगेश रोडे News publisher name | Date: 10-08-2026 News publication date | Time: 11:00 PM News publication time | Views: 17 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: योगेश रोडे News publisher name | Date: 10-08-2026 News publication date | Time: 11:00 PM News publication time | Views: 17 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement