अमृतचे सांगली जिल्हा अमृत व्यवस्थापक मनोज मिरासदार यांनी नुकतीच खानापूर तहसीलदार योगेश्वर टोपे यांची सदिच्छा भेट घेतली.
खानापूर: अमृत (AMRUT) संस्थेच्या विविध उपक्रमांचा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ ग्रामीण व तालुका स्तरावरील पात्र घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सांगली जिल्ह्याचे अमृत व्यवस्थापक मनोज मिरासदार यांनी नुकतीच खानापूर तहसीलदार योगेश्वर टोपे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान अमृत अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या भेटीत मनोज मिरासदार यांनी खानापूर तालुक्यातील युवक, महिला अमृतच्या लक्षित गटातील घटकांसाठी अमृत संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या शैक्षणिक, कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख योजनांची माहिती मा.तहसीलदारांना दिली. तसेच या योजनांची अंमलबजावणी अधिक गतीने व्हावी आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्याचा थेट फायदा पोहोचावा, यासाठी महसूल प्रशासनाचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. योजनांचा प्रसार: तालुक्यातील जास्तीत जास्त अमृतच्या लक्षित गटातील नागरिकांना योजनांशी जोडण्यासाठी प्रशासकीय स्तरावर जागृती निर्माण करणे.
कौशल्य विकास व रोजगार: स्थानिक युवकांसाठी स्वयंरोजगार आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमांची रूपरेषा ठरवणे.
खानापूर तहसीलदार यांनी या पुढाकाराचे स्वागत करत अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ तालुक्यातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तालुका प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन दिले.
या महत्त्वपूर्ण भेटीमुळे खानापूर तालुक्यातील अमृत योजनेच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२८७६६ अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment