छत्रपती संभाजीनगर येथील गुजराती विद्यामंदिर येथे अमृत पराक्रम दिनाच्या उपक्रमांची माहिती

छत्रपती संभाजीनगर येथील गुजराती विद्यामंदिर, खारा कुवा येथे अमृत पराक्रम दिनानिमित्त आयोजित वकृत्व, निबंध आणि रील स्पर्धांची माहिती देण्यासाठी अमृतच्या वतीने शाळेला भेट देण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर येथील गुजराती विद्यामंदिर येथे अमृत पराक्रम दिनाच्या उपक्रमांची माहिती मुख्य फोटो
मुख्य फोटो

छत्रपती संभाजीनगर : अमृत पराक्रम दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि रील स्पर्धेची माहिती देण्यासाठी अमृतच्या वतीने गुजराती विद्यामंदिर, खारा कुवा, छत्रपती संभाजीनगर येथे शाळेला भेट देण्यात आली.

यावेळी गुजराती समाजाचे अध्यक्ष श्री. राजेश मेहता आणि गुजराती विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली सोरटी यांची भेट घेऊन अमृत पराक्रम दिनाच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या वकृत्व, निबंध आणि रील स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यासोबतच अमृत संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांची माहितीही देण्यात आली. अमृतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत वर्ग’ या उपक्रमाची माहिती देताना, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांच्या ज्ञानात आणि आत्मविश्वासात होणाऱ्या सकारात्मक बदलांची माहिती देण्यात आली.

यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी अमृतच्या विविध योजना, उपक्रम तसेच अमृत वर्गाबाबत सविस्तर माहिती दिली. यावर मुख्याध्यापिका सौ. वैशाली सोरटी यांनी शाळेतील इयत्ता आठवी, नववी आणि दहावीचे विद्यार्थी अमृत पराक्रम दिनाच्या स्पर्धांमध्ये नक्की सहभागी होतील, तसेच शाळेच्या वतीने हा उपक्रम चांगल्या पद्धतीने राबविण्यात येईल, असे सांगितले.

तसेच विद्यार्थ्यांसाठी २१ ऑगस्ट रोजी गुजराती विद्यामंदिर येथे अमृत वर्ग घेण्यात यावा, अशी विनंती मुख्याध्यापिका वैशाली मॅडम यांनी केली. या अमृत वर्गामध्ये इयत्ता आठवी, नववी आणि दहावीचे विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७५अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 10-08-2026 News publication date | Time: 03:09 PM News publication time | Views: 29 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 10-08-2026 News publication date | Time: 03:09 PM News publication time | Views: 29 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement