अमृत पराक्रम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे विशेष व्याख्यान संपन्न

अमृत संस्था व ब्राह्मण समाज समन्वय समिती, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृत पराक्रम दिना’निमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. इतिहासतज्ज्ञ मा. जगन्नाथ लडकत यांनी बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम, युद्धनीती व राष्ट्रनिष्ठेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास अमृत जिल्हा टीम, ब्राह्मण समाज समन्वय समितीचे अध्यक्ष मिलिंद दामोदरे, सुरेश काका देशपांडे व नागरिक उपस्थित होते.

अमृत पराक्रम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे विशेष व्याख्यान संपन्न मुख्य फोटो
अमृत पराक्रम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे विशेष व्याख्यान संपन्न अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : अमृत संस्था आणि ब्राह्मण समाज समन्वय समिती, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त ‘अमृत पराक्रम दिना’चे विशेष व्याख्यान स्वामी रामानंद तीर्थ सभागृह, नागेश्वरवाडी येथे उत्साहात संपन्न झाले.

या कार्यक्रमात इतिहासतज्ज्ञ व अभ्यासक मा. जगन्नाथ लडकत यांनी थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम, राष्ट्रनिष्ठा, युद्धनीती आणि नेतृत्वगुणांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या माध्यमातून थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्यगाथेची आणि पराक्रमाची प्रेरणादायी माहिती मिळाली.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, अमृतच्या वतीने १८ ऑगस्ट हा ‘पराक्रम दिन’ म्हणून राज्यभर साजरा करण्यात येत आहे. नव्या पिढीला थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्याची व पराक्रमाची माहिती व्हावी, या उद्देशाने १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७५

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 10-08-2026 News publication date | Time: 03:08 PM News publication time | Views: 32 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 10-08-2026 News publication date | Time: 03:08 PM News publication time | Views: 32 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement