यवतमाळ येथे सक्षमच्या प्रांत कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक यवतमाळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीदरम्यान अमृतच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.अमृत पराक्रम दिनाची माहिती सांगून स्पर्धांच्या पोस्टरचे विमोचनही करण्यात आले.
यवतमाळ येथे सक्षमच्या प्रांत कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक यवतमाळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीदरम्यान महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था अमृतच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी विशेषतः ‘अमृत पराक्रम दिन’ या महत्त्वपूर्ण उपक्रमाची माहिती देण्यात आली. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त अमृतच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाण, राष्ट्रभक्ती, पराक्रमाची प्रेरणा आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच अमृतच्या माध्यमातून लक्षित घटकातील नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक, कौशल्य विकास, प्रशिक्षण, स्वयंरोजगार व उद्योजकता विकासाच्या विविध योजनांची माहितीही उपस्थितांना देण्यात आली. बैठकीदरम्यान ‘अमृत पराक्रम दिना’च्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले. या उपक्रमाची माहिती समाजातील अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत आणि युवकांपर्यंत पोहोचवून त्यांचा सहभाग वाढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ‘अमृत पराक्रम दिन’ हा केवळ स्पर्धेपुरता मर्यादित न राहता, इतिहासातील शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारा उपक्रम ठरावा, या उद्देशाने अमृतच्या वतीने विविध स्तरांवर जनजागृती करण्यात येत आहे. या बैठकीच्या माध्यमातून सक्षमच्या कार्यकर्त्यांना अमृतच्या उपक्रमांची माहिती मिळाल्याने भविष्यात अमृतच्या योजना व उपक्रम समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : परिक्षीत कमलकिशोर शर्मा जिल्हा व्यवस्थापक फोन नंबर- ९११२२२७६३३ जिल्हा कार्यालय पत्ता : स्वामी समर्थ विहार, पहिला माळा, फ्लॅट क्रमांक ए-१, अवधूतवाडी, तिवारी चौक, यवतमाळ - ४४५ ००१ ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment