अमृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींनी लातूर येथील अमृत कार्यालयाला भेट दिली. प्रशिक्षणातून प्राप्त कौशल्यांचा उपयोग करून स्वतःचा सौरऊर्जा व्यवसाय सुरू केल्याची माहिती प्रशिक्षणार्थींनी यावेळी दिली.
अमृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींनी लातूर येथील अमृत कार्यालयाला भेट दिली. प्रशिक्षणातून प्राप्त कौशल्यांचा उपयोग करून स्वतःचा सौरऊर्जा व्यवसाय सुरू केल्याची माहिती प्रशिक्षणार्थींनी यावेळी दिली. सूर्यमित्र प्रशिक्षणामुळे सौरऊर्जा क्षेत्रातील तांत्रिक कौशल्य, व्यवसायाच्या संधी तसेच प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाल्याचे प्रशिक्षणार्थींनी सांगितले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करून रोजगारनिर्मितीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचे अमृत कार्यालयाच्या वतीने कौतुक करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थींनी सुरू केलेल्या व्यवसायांची ‘अमृतपेठ’ या डिजिटल व्यासपीठावर नोंदणी करण्यात आली. अमृतपेठच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना व सेवांना अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रशिक्षित युवकांना स्वावलंबी होण्यासाठी तसेच आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. सूर्यमित्र प्रशिक्षणाच्या माध्यमातून केवळ कौशल्य प्रशिक्षण न देता प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि बाजारपेठेशी जोडण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे सौरऊर्जा क्षेत्रातील प्रशिक्षित युवकांच्या स्वावलंबनाला चालना मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७०
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment