यवतमाळ येथे राष्ट्रसेविका समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रांत घोष वर्गात विदर्भ प्रांतातील सुमारे ४०० हून अधिक स्वयंसेविका उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. या वर्गात महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या अमृतच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अमृत पराक्रम दिना’ बाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.
यवतमाळ येथे राष्ट्रसेविका समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रांत घोष वर्गात विदर्भ प्रांतातील सुमारे ४०० हून अधिक स्वयंसेविका उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. या वर्गात महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या अमृतच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अमृत पराक्रम दिना’ बाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. यावेळी अमृत सखी भार्गवी लाखे यांनी अमृत पराक्रम दिनाची संकल्पना, उद्देश तसेच या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त अमृतच्या वतीने ‘अमृत पराक्रम दिन’ आयोजित करण्यात येत असून, त्यांच्या शौर्य, पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि प्रेरणादायी कार्याची ओळख नव्या पिढीला करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अमृतच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा, व्याख्याने व उपक्रमांमध्ये युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. ऐतिहासिक महापुरुषांच्या जीवनकार्यापासून प्रेरणा घेऊन राष्ट्रभक्ती, शौर्य, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. विदर्भ प्रांतातून सहभागी झालेल्या सुमारे ४०० हून अधिक स्वयंसेविकांना अमृत पराक्रम दिनाची माहिती देण्यात आल्याने या उपक्रमाचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचण्यास मदत झाली. अधिक माहितीसाठी संपर्क : परिक्षीत कमलकिशोर शर्मा जिल्हा व्यवस्थापक फोन नंबर- ९११२२२७६३३ जिल्हा कार्यालय पत्ता : स्वामी समर्थ विहार, पहिला माळा, फ्लॅट क्रमांक ए-१, अवधूतवाडी, तिवारी चौक, यवतमाळ - ४४५ ००१ ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment