इतिहास अभ्यासक मा . जगन्नाथजी लडकत यांचे अमृत विभाग व जिल्हा कार्यालयात स्वागत

अमृत छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालय येथे ‘अमृत पराक्रम दिना’निमित्त इतिहास अभ्यासक व व्याख्याते मा. जगन्नाथजी लडकत यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, भारत कापरे, विजय कुलकर्णी, रुपेश बंगाळे व बाळकृष्ण बावस्कर उपस्थित होते.

इतिहास अभ्यासक मा . जगन्नाथजी लडकत यांचे अमृत विभाग व जिल्हा  कार्यालयात स्वागत मुख्य फोटो
इतिहास अभ्यासक मा . जगन्नाथजी लडकत यांचे अमृत विभाग व जिल्हा  कार्यालयात स्वागत अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : अमृत, छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालय येथे ‘अमृत पराक्रम दिना’निमित्त सन्माननीय इतिहास अभ्यासक व व्याख्याते मा. जगन्नाथजी लडकत यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी मा. जगन्नाथजी लडकत यांनी उपस्थित नागरिकांना अपराजित योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अद्वितीय शौर्य, पराक्रम व युद्धनीतीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पालखेडच्या ऐतिहासिक युद्धाचे महत्त्व आणि बाजीराव पेशव्यांच्या युद्धकौशल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

इतिहासातील शौर्यगाथा आणि पराक्रमाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल याप्रसंगी राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, भारत कापरे, विजय कुलकर्णी, रुपेश बंगाळे, बाळकृष्ण बावस्कर आदी उपस्थित होते .

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 10-08-2026 News publication date | Time: 12:29 PM News publication time | Views: 95 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 10-08-2026 News publication date | Time: 12:29 PM News publication time | Views: 95 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement