अमृत योजना व श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित अमृत पराक्रम दिनाबाबत चर्चा झाली.
जिल्हा परिषद सातारा येथे आयोजित एका विशेष भेटीदरम्यान जिल्हाध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान 'अमृत' योजनेची सविस्तर माहिती देण्यासोबतच श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित अमृत पराक्रम दिनाबाबत आणि त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. थोरले बाजीराव पेशवे यांच्या युद्धकौशल्य, धोरणीपणा आणि शौर्याचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा अमृत पराक्रम दिन विशेष महत्त्वाचा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे यांनी या दोन्ही विषयांची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. अमृत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि ऐतिहासिक पराक्रम दिनाच्या औचित्याने राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांना जिल्हा परिषदेच्या वतीने आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
श्री. विनायक पाठकजी जिल्हा व्यवस्थापक ,सातारा -9112227638
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment