देवगिरी बँकेचे मॅनेजर प्रशांत जोशी, क्लस्टर हेड अजय सराफ व मार्केटिंग हेड दीपक बावस्कर यांनी अमृत छत्रपती संभाजीनगर कार्यालयास भेट देऊन अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती घेतली.
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी बँकेचे मॅनेजर प्रशांत जोशी, क्लस्टर हेड अजय सराफ तसेच मार्केटिंग हेड दीपक बावस्कर यांनी अमृत छत्रपती संभाजीनगर कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
यावेळी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. तसेच श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अमृत पराक्रम दिना’ची माहिती देण्यात आली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांची माहिती यावेळी देण्यात आली.
अमृतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांचे देवगिरी बँकेच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी हे उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरतील, असे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment