‘अमृत पराक्रम दिना’निमित्त परभणीत बाजीरावांच्या शौर्यगाथेचा जागर

इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांचे प्रभावी व्याख्यान; परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘अमृत पराक्रम दिना’निमित्त परभणीत बाजीरावांच्या शौर्यगाथेचा जागर मुख्य फोटो
‘अमृत पराक्रम दिना’निमित्त परभणीत बाजीरावांच्या शौर्यगाथेचा जागर अतिरिक्त फोटो

परभणी : अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अद्वितीय शौर्य, पराक्रम, नेतृत्वगुण आणि दूरदृष्टीची प्रेरणादायी गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने ‘अमृत पराक्रम दिन’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त परभणी येथील कौस्तुभ मंगल कार्यालयात प्रसिद्ध इतिहास अभ्यासक मा. जगन्नाथ लडकत यांचे ऐतिहासिक व अभ्यासपूर्ण व्याख्यान उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमास अमृत संस्थेचे राज्य समन्वयक मा. दीपकजी जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या अद्वितीय पराक्रमाचा इतिहास उलगडताना मा. जगन्नाथ लडकत यांनी बाजीरावांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची, धाडसी रणनितीची आणि स्वराज्यविस्तारातील महत्त्वपूर्ण योगदानाची विविध ऐतिहासिक संदर्भांसह माहिती दिली. ओघवत्या आणि प्रभावी शैलीतील त्यांच्या मांडणीमुळे उपस्थितांना बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाची ऐतिहासिक व्याप्ती आणि त्यांच्या नेतृत्वाचे सामर्थ्य अनुभवता आले. श्रीमंत बाजीराव पेशवे हे केवळ रणांगणावरील पराक्रमासाठीच नव्हे, तर वेगवान निर्णयक्षमता, ध्येयवाद, नेतृत्वगुण आणि दूरदृष्टीसाठीही इतिहासात अजरामर झाले आहेत. त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श आजच्या युवा पिढीसमोर ठेवणे आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणादायी ओळख नव्या पिढीला करून देणे, हा ‘अमृत पराक्रम दिन’ आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे. या व्याख्यानाला परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध क्षेत्रांतील मान्यवर, इतिहासप्रेमी नागरिक आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. व्याख्यानाच्या माध्यमातून उपस्थितांना महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातील एका अद्वितीय योद्ध्याच्या कार्याची सखोल माहिती मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आत्मोन्नती प्रतिष्ठानचे शंकरजी आजगावकर तसेच गिरिजा शंकर आजेगावकर(नगरसेविका, महानगरपालिका परभणी) यांचे विशेष सहकार्य लाभले. ‘अमृत पराक्रम दिना’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यासोबतच युवा पिढीमध्ये शौर्य, नेतृत्व, ध्येयवाद आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७३


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 10-08-2026 News publication date | Time: 08:38 AM News publication time | Views: 58 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 10-08-2026 News publication date | Time: 08:38 AM News publication time | Views: 58 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement