अमृत पराक्रम दिन’ स्पर्धेच्या प्रचारासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल भाऊ लातूरकर यांचे सहकार्याचे आश्वासन
‘अमृत पराक्रम दिन’ स्पर्धेच्या प्रचारासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल भाऊ लातूरकर यांचे सहकार्याचे आश्वासन** नांदेड : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त अमृत संस्थेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात अमृत पराक्रम दिन’अंतर्गत निबंध, वक्तृत्व आणि Reels स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना अमृत संस्थेच्या वतीने आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेची अधिकृत माहिती ब्राह्मण समाजातील विद्यार्थी व युवकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचावी, या उद्देशाने अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सौरभ संतोष कुलकर्णी यांनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. निखिल भाऊ लातूरकर यांची भेट घेऊन त्यांना स्पर्धेबाबतचे अधिकृत पत्र व माहिती दिली. यावेळी श्री. कुलकर्णी यांनी महासंघाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमार्फत तसेच ब्राह्मण समाजातील विद्यार्थी व युवकांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशी विनंती श्री. निखिल भाऊ लातूरकर यांच्याकडे केली. श्री. निखिल भाऊ लातूरकर यांनी स्पर्धेची माहिती जाणून घेत या उपक्रमाचे स्वागत केले असून, स्पर्धेचा प्रचार-प्रसार आपल्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे ‘अमृत पराक्रम दिन’ स्पर्धेला महाराष्ट्रभर व्यापक प्रतिसाद मिळण्यास निश्चितच मदत होणार आहे. बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या या उपक्रमासाठी **निखिल भाऊ लातूरकर यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७२
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment