अमृत EDP प्रशिक्षणाचा पाली, सुधागड(जि.रायगड) येथे उत्साहात शुभारंभ!

अमृत संस्था रायगड जिल्हा अलिबाग कार्यालया तर्फे उद्योजकता विकास कार्यक्रमाचे श्री अष्टविनायक क्षेत्र श्री बल्लाळेश्वर देवस्थान सुधागड पाली , येथे आज उद्घाटन झाले.

अमृत EDP प्रशिक्षणाचा पाली, सुधागड(जि.रायगड)  येथे उत्साहात शुभारंभ! मुख्य फोटो
अमृत EDP प्रशिक्षणाचा पाली, सुधागड(जि.रायगड)  येथे उत्साहात शुभारंभ! अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने श्री अष्टविनायक क्षेत्र श्री बल्लाळेश्वर देवस्थान सुधागड पाली , येथे दिनक ७ ऑगस्ट २०२६ रोजी 'अमृत उद्योग कौशल्यवर्धन' (Entrepreneurship Development Program - EDP) या दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला.कार्यक्रमाचा शुभारंभ भारतमाता पूजनाने झाला. या प्रशिक्षणामध्ये पहिले ४ दिवस प्रत्यक्ष (ऑफलाईन) प्रशिक्षण तर पुढील ६ दिवस ऑनलाईन व्हिडिओ सत्रांद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या दहा दिवसीय प्रशिक्षणातून नवीन उद्योग कसा सुरू करावा? अस्तित्वातील उद्योगाचा विस्तार (Scale-up) कसा करावा? आर्थिक नियोजन, बँक कर्ज प्रक्रिया, व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे.

उद्घाटन प्रसंगी श्री मिलिंद भावे (उद्योजक), श्री. शैलेश मराठे (जिल्हा व्यवस्थापक,रायगड- अलिबाग ),मंगेश भागूरम ढेबे (जिल्हा उपव्यवस्थापक) हे मान्यवर उपस्थित होते. पाली येथील यशस्वी उद्योजक श्री मिलिंद भावे यांनी व्यवसायाची सुरवात कशी केली? आर्थिक नियोजन कसे केले? सुरुवातीचे भांडवल कसे उभे केले?कामगार नियोजन, व्यवसायातील महत्वाचे टप्पे,अडचणी, त्याचे निवारण कसे केले? आदि विषयावर चर्चा केली. तसेच महिला नव उद्योजिकांना जिद्द आणि शिकण्याची तयारी नेहमी अंगी बाळगा असा संदेशही दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शैलेश मराठे यांनी केले . तसेच कार्यक्रमाचे नियोजन मंगेश भागूरम ढेबे (जिल्हा उपव्यवस्थापक) ह्यांनी केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यातील पाली सुधागड येथील नवउद्योजक प्रशिक्षणार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२८७५९ अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 08-08-2026 News publication date | Time: 03:52 PM News publication time | Views: 108 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 08-08-2026 News publication date | Time: 03:52 PM News publication time | Views: 108 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement