महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘पराक्रम दिनानिमित्त’ आयोजित करण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेचे निवेदन गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्यांना देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘पराक्रम दिनानिमित्त’ आयोजित करण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेचे निवेदन गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्यांना देण्यात आले. या स्पर्धेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, यासाठी प्राचार्यांना स्पर्धेचे स्वरूप, विषय, नियम व सहभागाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, त्यांच्या पराक्रमाची व कार्याची ओळख व्हावी तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. यावेळी अमृत संस्थेचे पदाधिकारी अमृत मित्र श्री. विश्वास बदापूरकर उपस्थित होते. गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री हटकर सर यांनी या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१० ६५४७४
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment