विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील जिल्हा परिषद शाळेत आज ‘अमृत वर्गा’चे आयोजन करण्यात आले.
ताडकळस, ता. पूर्णा : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील जिल्हा परिषद शाळेत आज ‘अमृत वर्गा’चे आयोजन करण्यात आले. उर्मिला गारकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या वर्गाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘अमृत वर्गा’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच बौद्धिक खेळ, बोधकथा, आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि सकारात्मक दृष्टिकोन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आपले विचार मांडले. शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पूरक ठरावे, या उद्देशाने अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित होत आहे. ताडकळस येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आलेल्या या ‘अमृत वर्गामुळे’ विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, उपक्रमशील शिक्षणाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७३
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment