माजलगाव येथे अमृतच्या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमास उत्साहात प्रारंभ

अमृतच्या वतीने श्री इन्फोटेक, शाहू नगर, माजलगाव येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण (Entrepreneurship Development Program - EDP) या दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला.

माजलगाव येथे अमृतच्या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमास उत्साहात प्रारंभ मुख्य फोटो
माजलगाव येथे अमृतच्या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमास उत्साहात प्रारंभ अतिरिक्त फोटो

माजलगाव, दि. ८ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने श्री इन्फोटेक, शाहू नगर, माजलगाव येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण (Entrepreneurship Development Program - EDP) या दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. या प्रशिक्षणामध्ये पहिले ४ दिवस प्रत्यक्ष (ऑफलाईन) प्रशिक्षण तर पुढील ६ दिवस ऑनलाईन सत्रांद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणामध्ये उद्योग व व्यवसाय व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, विपणन, शासकीय योजना, व्यक्तिमत्त्व विकास, उद्योजकीय कौशल्ये तसेच व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन अमृतचे विभागीय उपव्यवस्थापक श्री. ओंकार शेटे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रा. डॉ. महेश देशमुख, श्री. प्रवीण वेताळ तसेच अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. विशाल जोशी उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी श्री. ओंकार शेटे यांनी अमृतच्या विविध योजना, उपक्रम तसेच उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबत माहिती दिली. तसेच उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दहा दिवसांच्या अभ्यासक्रमाची रूपरेषा उपस्थितांना समजावून सांगितली. प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात प्रा. डॉ. महेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उद्योजकता म्हणजे काय, उद्योजकांचे समाज व अर्थव्यवस्थेतील योगदान, उद्योजक कोण होऊ शकतो तसेच यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक असणारे गुण, कौशल्ये आणि दृष्टीकोन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रासंबंधी मूलभूत संकल्पना उपस्थितांना समजावून सांगितल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. विशाल जोशी यांनी केले. तर श्री इन्फोटेकचे श्री. प्रवीण वेताळ यांनी उपस्थित मान्यवर, प्रशिक्षणार्थी व आयोजकांचे आभार मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन अमृतचे समन्वयक श्री. सुमित धिरडे यांनी केले. प्रशिक्षणास विविध क्षेत्रातील उद्योजक व व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65468

अमृत संस्थेचे बीड जिल्हा कार्यालय, अथर्व अभ्यासिकेच्या वर, नवगण कॉलेज रोड, वाघ नेत्रालयाशेजारी बीड. 431122

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 08-08-2026 News publication date | Time: 11:30 AM News publication time | Views: 141 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 08-08-2026 News publication date | Time: 11:30 AM News publication time | Views: 141 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement