अहिल्यानगर मधील मुख्याध्यापक संघांचे मा.अध्यक्ष प्राचार्य सुनिल पंडित सर यांची भेट घेऊन अमृत पराक्रम दिन निमित्त चालू असलेल्या विविध स्पर्धा यांचे पत्र देण्यात आले.
अहिल्यानगर मधील दि प्रोग्रेसिव्ह इज्युकेशन सोसायटी चे प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील प्राचार्य मा. सुनील पंडीत सर यांना जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी 'अमृत पराक्रम दिन'(श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - अपराजित योद्धा )वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा, रील स्पर्धा यांचे पत्र दिले. विदयालयातील सर्व वर्गनिहाय मेसेज त्यांनी फॉरवर्ड केला तसेच मा सुनिल पंडित सर हे मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष असून स्पर्धा मध्ये अधिक विद्यार्थी सहभागी होतील यासाठी सहकार्य करण्याची सकारात्मकता दाखवली. त्यांनी यथोचित सन्मान करत अमृत संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक ही केले.
अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769
जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment