भडगाव(जि.जळगाव) येथे ईडीपीच्या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संपन्न

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात लक्षित समाजाच्या खुल्या वर्गातील प्रशिक्षणार्थीं प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.

 भडगाव(जि.जळगाव) येथे ईडीपीच्या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संपन्न मुख्य फोटो
 भडगाव(जि.जळगाव) येथे ईडीपीच्या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संपन्न अतिरिक्त फोटो

भडगाव (जळगांव जिल्हा) येथे EDP बॅच चे उद्घाटन भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण मान्यवरांच्या हस्ते करून,बँक बाबतीत माहिती, कागदपत्रे बाबत प्रथम सत्र संपन्न उद्घाटन हस्ते:- श्री. प्रा. देवेंद्र मस्की (माननीय तालुका संघ* चालक) उपस्थित प्रमुख मान्यवर -

श्री विजय विष्णुपंत देशपांडे- विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष केशवसुत ज्ञानप्रबोधिनी निवृत्त बँक अधिकारी , एडवोकेट श्री निलेश तिवारी- (अखिल भारतीय अधिवक्ता परिषद तालुका अध्यक्ष), श्री परमेश्वर राजपूत (तालुका बौद्धिक प्रमुख), श्री. पंकज पाटील -(जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड जळगाव शाखा अधिकारी भडगाव तालुका) यावेळी बोलताना श्री. मस्की सर म्हणाले की," अमृतच्या सर्व योजना खुल्यावर्गांसाठी खूपच उपयुक्त आहे. यासाठी प्रशिक्षण गरजेचे आहे. व्यवसाय करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत". अँड. निलेश तिवारी म्हणाले की, "चातक पक्षी जसा स्वाती नक्षत्राची वाट पहात असतो त्याच प्रमाणे अमृत च्या योजनेत शासनाने जे समाज सामाविष्ट केलीत ते याच संधीची वाट बघत होते ती संधी या शासनाने उपलब्ध करून दिली ती या खुल्यावर्गाने खुल्या दिलाने स्वीकाराव्या". श्री. विजयराव देशपांडे यांनी तरुणांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक अमृत जिल्हा व्यवस्थापक श्री राजेंद्र कानडे यांनी केले. आभार व परिचय किरण शिंपी अमृत मित्र यांनी केले.

अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७६

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/





Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 08-08-2026 News publication date | Time: 07:57 AM News publication time | Views: 68 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news
Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 08-08-2026 News publication date | Time: 07:57 AM News publication time | Views: 68 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement