महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या पुढाकाराने युवकांना आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम व स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने आयोजित Solar PV Installation & Maintenance प्रशिक्षण बॅचचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
बुलढाणा जिल्हातील हिवरा आश्रम येथे अमृतच्या सोलर प्रशिक्षण बॅचचा शुभारंभ सौर ऊर्जा क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षणातून युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी बुलढाणा : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या पुढाकाराने युवकांना आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम व स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने आयोजित Solar PV Installation & Maintenance प्रशिक्षण बॅचचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. देशातील वाढती सौर ऊर्जेची गरज आणि या क्षेत्रातील रोजगाराच्या वाढत्या संधी लक्षात घेता, अमृतच्या माध्यमातून युवकांना सौर ऊर्जा क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार, स्वयंरोजगार तसेच उद्योजकतेच्या दिशेने सक्षम करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. उद्घाटन सत्रास मा. विभागीय व्यवस्थापक श्री. प्रवीणजी कोळेश्वर, विवेकानंद आश्रमाचे सचिव श्री. संतोषजी गोरे, जिल्हा व्यवस्थापक श्री. जिग्नेश कमानी, श्री. गणेश गुप्ता तसेच श्री. नंदकिशोर मगर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना “सौर ऊर्जा हे भविष्यातील अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. बदलत्या काळानुसार आवश्यक कौशल्ये आत्मसात करून युवकांनी रोजगाराच्या संधींसोबतच स्वतःचा व्यवसाय उभारण्याच्या दिशेनेही पुढे यावे,” असे आवाहन केले. या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींना Solar PV Installation & Maintenance, सौर ऊर्जा प्रणालीची उभारणी, देखभाल-दुरुस्ती, तांत्रिक बाबी तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे उद्योगाभिमुख प्रशिक्षण दिले जाणार आहे. केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता युवकांच्या हाताला कौशल्य, कौशल्याला रोजगार आणि रोजगारातून स्वावलंबन मिळवून देण्याचा अमृतचा प्रयत्न आहे. सौर ऊर्जा क्षेत्रात भविष्यात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींचा विचार करता, अमृतची ही प्रशिक्षण बॅच युवकांच्या कौशल्य विकासासाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२७६३७
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment