अमृत पराक्रम दिनाची नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल अकॅडमी, वाशी येथे दिली माहिती

कोल्हापूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने 'अमृत पराक्रम दिन' निमित्त अष्टविनायक शिक्षण संस्थेच्या "नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल अकॅडमी, वाशी" येथे माहिती देण्यात आली. व्याख्यानास शाळेतील सुमारे १८० विद्यार्थी उपस्थित होते.

अमृत पराक्रम दिनाची नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल अकॅडमी, वाशी येथे दिली माहिती   मुख्य फोटो
अमृत पराक्रम दिनाची नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल अकॅडमी, वाशी येथे दिली माहिती   अतिरिक्त फोटो

अमृतच्या वतीने 'अमृत पराक्रम दिन' निमित्त अष्टविनायक शिक्षण संस्थेच्या "नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल अकॅडमी, वाशी" येथे प्रेरणादायी व्याख्यानाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. या व्याख्यानास शाळेतील सुमारे १८० विद्यार्थी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

कार्यक्रमात अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. प्रशांत जोशी यांनी "अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे"यांच्या अद्वितीय पराक्रमाची, राष्ट्रनिष्ठ नेतृत्वाची आणि मराठा साम्राज्याच्या विस्तारातील त्यांच्या ऐतिहासिक योगदानाची प्रेरणादायी माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि नेतृत्वगुणांचा आदर्श आजच्या युवकांनी आत्मसात करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक श्री. अभिजीत कुलकर्णी यांनी 'अमृत पराक्रम दिन' निमित्त राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व आणि रिल्स स्पर्धांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमान, राष्ट्रप्रेम, अभ्यासाची सवय आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या कलागुणांना व विचारांना योग्य व्यासपीठ मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले.

या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची ओळख तर झालीच, शिवाय इतिहासातून राष्ट्रभक्ती, शौर्य आणि नेतृत्वाची प्रेरणा घेण्याची संधीही मिळाली.

सदर व्याख्यानाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी "नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल अकॅडमी, वाशी" येथील श्री. सुनील हांडे सर यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या मोलाच्या सहकार्याबद्दल अमृतच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

अधिक माहितीसाठी - ९११२२२८७६४

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Prashant Arun Joshi News publisher name | Date: 07-08-2026 News publication date | Time: 04:13 PM News publication time | Views: 51 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news
Publisher: Prashant Arun Joshi News publisher name | Date: 07-08-2026 News publication date | Time: 04:13 PM News publication time | Views: 51 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement