अमृत पराक्रम दिन' स्पर्धांच्या प्रचारासाठी,गटशिक्षण अधिकारी नायगांव, उमरी व नायगांव मधील शाळा-महाविद्यालयांना निवेदन

अमृत पराक्रम दिन' स्पर्धांच्या प्रचारासाठी,गटशिक्षण अधिकारी नायगांव, उमरी व नायगांव मधील शाळा-महाविद्यालयांना निवेदन देण्यात आले.

अमृत पराक्रम दिन' स्पर्धांच्या प्रचारासाठी,गटशिक्षण अधिकारी नायगांव, उमरी व नायगांव मधील शाळा-महाविद्यालयांना निवेदन मुख्य फोटो
अमृत पराक्रम दिन' स्पर्धांच्या प्रचारासाठी,गटशिक्षण अधिकारी नायगांव, उमरी व नायगांव मधील शाळा-महाविद्यालयांना निवेदन अतिरिक्त फोटो

अमृत पराक्रम दिन' स्पर्धांच्या प्रचारासाठी,गटशिक्षण अधिकारी नायगांव, उमरी व नायगांव मधील शाळा-महाविद्यालयांना निवेदन देण्यात आले आहे. नांदेड, दि. ७ ऑगस्ट : बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त आयोजित 'अमृत पराक्रम दिन' निबंध, वक्तृत्व व रील स्पर्धांचा अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत प्रचार व्हावा आणि मोठ्या संख्येने सहभाग मिळावा यासाठी आज अमृत संस्थेचे नांदेड उपजिल्हाव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी यांनी मा.गटशिक्षण अधिकारी तालुका नायगांव व उमरी तसेच यमुनाबाई मुलींचे महाविद्यालय व ज्युनिअर महाविद्यालय, श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ, नायगाव, जनता माध्यमिक, महाविद्यालय व उच्च महाविद्यालय नायगांव येथील प्राचार्य, मुख्याध्यापकांना निवेदनपत्र सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाला शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्याची ग्वाही दिली.

अधिक माहितीसाठी संपर्क - ७३९१०६५४७२

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 07-08-2026 News publication date | Time: 04:09 PM News publication time | Views: 44 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news
Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 07-08-2026 News publication date | Time: 04:09 PM News publication time | Views: 44 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement