पोईसरमध्ये लवकरच राबवला जाणार अमृत कौशल्य उपक्रम

जिमखान्याकडून मोफत उपलब्ध होणार जागा

पोईसरमध्ये लवकरच राबवला जाणार अमृत कौशल्य उपक्रम मुख्य फोटो
मुख्य फोटो

मुंबई शहर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून लक्ष्यित गटातील उमेदवारांच्या कौशल्यवृद्धीसाठी विविध उपक्रम राबवले जातात. या उमेदवारांना स्वतःच्या पायावर उभे करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या संस्थेच्या अमृत कौशल्य उपक्रमांसाठी पोईसर जिमखान्यात मोफत जागा उपलब्ध केली जाणार आहे.

पोईसर जिमखान्याचे अध्यक्ष आणि शेट्टी समाजाचे करुणाकर शेट्टी यांची अमृत संस्थेतर्फे भेट घेऊन अमृत संस्थेच्या सर्व योजनांवर चर्चा करण्यात आली. त्यात अमृत कौशल्य उपक्रमासंदर्भातही चर्चा झाली. अमृत कौशल्य हा उपक्रम चांगला असून, सामाजिक भान ठेवून आपण त्यासाठी येथे मोफत जागा देऊ, असे शेट्टी यांनी या वेळी सांगितले. या बैठकीला अमृत संस्थेचे मुंबई शहर जिल्हा उपव्यवस्थापक प्रणय तीर्थंकर, करुणाकर शेट्टी, बळवंत राय यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: Rajesh Pawar News publisher name | Date: 28-12-2025 News publication date | Time: 04:46 PM News publication time | Views: 52 Number of times this news has been viewed | District: mumbai_city Related district of the news
Publisher: Rajesh Pawar News publisher name | Date: 28-12-2025 News publication date | Time: 04:46 PM News publication time | Views: 52 Number of times this news has been viewed | District: mumbai_city Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words