अमृत पराक्रम दिनानिमित्त श्रीरामपूर (जि.अहिल्यानगर) शाज पाटणी विद्यालयात निवेदन

अमृत पराक्रम दिनानिमित्त शाज पाटणी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना अमृत पराक्रम दिनाचे पत्र देण्यात आले.

अमृत पराक्रम दिनानिमित्त श्रीरामपूर (जि.अहिल्यानगर) शाज पाटणी विद्यालयात निवेदन  मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमृत पराक्रम दिनानिमित्त श्रीरामपूर येथील शाज पाटणी विद्यालयास सदिच्छा भेट देण्यात आली.

यावेळी अमृत मित्र शरद क्षीरसागर यांनी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. कांबळे चित्रा संजय यांची भेट घेऊन अमृत पराक्रम दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली तसेच स्पर्धेचे निवेदन व माहितीपत्रक सुपूर्द केले.

प्राचार्या सौ. कांबळे चित्रा संजय यांनी या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याची ग्वाही दिली. तसेच विद्यालयामार्फत अमृत पराक्रम दिनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.

अधिक माहिती साठी :- ९११२२२८७६९

अमृत संस्थेविषयी :- महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 07-08-2026 News publication date | Time: 03:36 PM News publication time | Views: 33 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 07-08-2026 News publication date | Time: 03:36 PM News publication time | Views: 33 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement