'अमृत' नांदेडतर्फे प्रतिभानिकेतन हायस्कूलला अमृत पराक्रम दिन राज्यस्तरीय स्पर्धेचे निवेदन

'अमृत' नांदेडतर्फे प्रतिभानिकेतन हायस्कूलला अमृत पराक्रम दिन राज्यस्तरीय स्पर्धेचे निवेदन.

'अमृत' नांदेडतर्फे प्रतिभानिकेतन हायस्कूलला अमृत पराक्रम दिन राज्यस्तरीय स्पर्धेचे निवेदन मुख्य फोटो
मुख्य फोटो

'अमृत' नांदेडतर्फे प्रतिभानिकेतन हायस्कूलला अमृत पराक्रम दिन राज्यस्तरीय स्पर्धेचे निवेदन. नांदेड : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)' यांच्या वतीने अमृत पराक्रम दिनानिमित्त "अपराजित योद्धा – थोरले बाजीराव पेशवे" या विषयावर राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी व तरुणांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा, या उद्देशाने अमृत नांदेडचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सौरभ माळहिप्परगेकर आणि अमृत मित्र श्री. विश्वास बदापूरकर यांनी प्रतिभानिकेतन हायस्कूल ला भेट देऊन प्राचार्य श्री.सोनवणे यांना स्पर्धेचे निवेदन सादर केले. यावेळी स्पर्धेची उद्दिष्टे, सहभागाची प्रक्रिया तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या विविध संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या ज्ञान, वक्तृत्व आणि सर्जनशीलतेचा ठसा उमटवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

अधिक माहितीसाठी संपर्क- - ७३९१०६५४७२

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: सौरभ कुलकर्णी News publisher name | Date: 07-08-2026 News publication date | Time: 03:38 PM News publication time | Views: 24 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news
Publisher: सौरभ कुलकर्णी News publisher name | Date: 07-08-2026 News publication date | Time: 03:38 PM News publication time | Views: 24 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement