मेहकर (जि.बुलडाणा) शहरामध्ये अमृत पेठ प्रदर्शन २०२६ चे दिमाखात उद्घाटन

अमृत संस्थेतर्फे आयोजित ‘अमृत पेठ प्रदर्शन २०२६’ या भव्य प्रदर्शनाचे मेहकर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात उद्घाटन संपन्न झाले. स्वामी समर्थ केंद्र हॉल, मेहकर येथे आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय प्रदर्शनाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाला.

मेहकर (जि.बुलडाणा) शहरामध्ये अमृत पेठ प्रदर्शन २०२६ चे दिमाखात उद्घाटन मुख्य फोटो
मेहकर (जि.बुलडाणा) शहरामध्ये अमृत पेठ प्रदर्शन २०२६ चे दिमाखात उद्घाटन अतिरिक्त फोटो

मेहकर शहरामध्ये ‘अमृत पेठ प्रदर्शन २०२६’ चे दिमाखात उद्घाटन

मेहकर (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) संस्थेतर्फे आयोजित ‘अमृत पेठ प्रदर्शन २०२६ या भव्य प्रदर्शनाचे मेहकर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात उद्घाटन संपन्न झाले.

स्वामी समर्थ केंद्र हॉल, मेहकर येथे आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय प्रदर्शनाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाला.

उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजयभाऊ राजमुलकर (माजी आमदार), किशोरभाऊ गारोळे (नगराध्यक्ष, मेहकर), धनराज राठी, डॉ. सुभाष भुतडा, प्रकाश चौधरी, आकाशजी सास्ते, नितीन बावणे, सिद्धेशजी व्यास, जीवनजी शर्मा (जिल्हा सहमंत्री VHP),प्रवीणजी कोळेश्वर (विभागीय व्यवस्थापक, अमरावती विभाग – अमृत) तसेच जिग्नेश कमानी (जिल्हा व्यवस्थापक, बुलढाणा – अमृत) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविते.

या प्रशिक्षणातून घडलेल्या लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे, ग्राहकांशी थेट संपर्क निर्माण करणे आणि व्यवसायवृद्धीस चालना देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.

प्रदर्शनामध्ये विविध प्रकारची दर्जेदार उत्पादने नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. मेहकर शहर व तालुक्यातील शेकडो नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देत उद्योजकांच्या उत्पादनांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे अनेक लघुउद्योजकांना आपल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी नवी संधी उपलब्ध झाली.

उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी ‘अमृत’ संस्थेच्या या अभिनव उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. नवउद्योजकांनी गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करून उद्योग क्षेत्रात यशस्वी वाटचाल करावी व अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रदर्शनाचे आयोजन अमृत मित्र व अमृत सखी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री जिग्नेश कमानी जिल्हा व्यवस्थापक, नंदकिशोर मगर,सौ. नम्रता वाचपे व अमृतच्या सर्व अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले.

अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२२७६३७

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Nandakishor Magar News publisher name | Date: 07-08-2026 News publication date | Time: 02:25 PM News publication time | Views: 245 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news
Publisher: Nandakishor Magar News publisher name | Date: 07-08-2026 News publication date | Time: 02:25 PM News publication time | Views: 245 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement