अमृत संस्था व तहसील कार्यालय, पवनी(जि.भंडारा) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रम संपन्न

अमृत संस्था व तहसील कार्यालय, पवनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृत संवाद सेतू’ या मार्गदर्शनपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात संत जगनाडे महाराज खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

अमृत संस्था व तहसील कार्यालय, पवनी(जि.भंडारा) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रम संपन्न मुख्य फोटो
अमृत संस्था व तहसील कार्यालय, पवनी(जि.भंडारा) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रम संपन्न अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) व तहसील कार्यालय, पवनी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० ते ४.३० वाजता ‘अमृत संवाद सेतू’ या मार्गदर्शनपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी व्हावा तसेच युवकांना, पवनी येथे आयोजित या उपक्रमात संत जगनाडे महाराज खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ४५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रतिनिधित्व संस्थेचे शिक्षक श्री. रायपूरकर सर यांनी केले.

यावेळी मा. तहसीलदार तथा तालुका समन्वय अधिकारी (अमृत) श्री. सतीश साळवे यांनी विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातील विविध विभागांच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली.

आस्थापना, आवक-जावक, प्रस्तुतकार, अन्नधान्य विभाग, सेतू विभाग, निवडणूक विभाग, लेखा विभाग, संजय गांधी व इंदिरा गांधी निराधार योजना, जन्म-मृत्यू नोंदणी तसेच विविध शासकीय दाखले याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.

मार्गदर्शन करताना श्री. साळवे यांनी विद्यार्थ्यांनी शासकीय कार्यालयीन कामकाजाची योग्य माहिती करून घ्यावी आणि आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित जतन करावीत, असे आवाहन केले.

प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःकडे असलेल्या महत्त्वाच्या दस्तऐवजांची किमान एक रंगीत प्रत काढून सुरक्षित ठेवावी, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. तसेच पालक आणि पाल्य यांच्यातील नातेसंबंध सकारात्मक व संवादपूर्ण असणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेताना आवश्यक असणारी कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि संबंधित विभागांची भूमिका समजून घेता आली. त्यामुळे भविष्यात नागरिक म्हणून शासकीय यंत्रणेशी संवाद साधताना या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होणार आहे.

कार्यक्रमास मा. नायब तहसीलदार श्री. किशोर राऊत, मा. नायब तहसीलदार (महसूल) श्री. प्रमोद राऊत, मा. नायब तहसीलदार (निवडणूक) श्रीमती शुभदा धुर्वे, महसूल सहाय्यक श्री. राजेश नागपुरे, सहाय्यक महसूल अधिकारी श्री. हितेश बोदेले व श्री. किरण चौधरी, आवक-जावक विभागातील श्री. महेश घोडेस्वार तसेच संगणक परिचालक श्री. अक्षय भोवते यांची उपस्थिती होती. शासकीय कार्यालयातील विविध विभागांचे कार्य, प्रशासकीय प्रक्रिया आणि नागरिकांना उपलब्ध असलेल्या सेवांची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना मिळाल्याने ‘अमृत संवाद सेतू’ हा उपक्रम ज्ञानवर्धक, मार्गदर्शक आणि प्रशासकीय जाणीव निर्माण करणारा ठरला.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. ओमकार हरदास यांनी मा. तहसीलदार श्री. सतीश साळवे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच, संत जगनाडे महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने श्री. रायपूरकर सर यांनी मा. नायब तहसीलदार श्री. किशोर राऊत यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यानंतर उपक्रमाचा समारोप करण्यात आला.

अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२८७७५


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: sakshi Joshi News publisher name | Date: 07-08-2026 News publication date | Time: 01:46 PM News publication time | Views: 62 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news
Publisher: sakshi Joshi News publisher name | Date: 07-08-2026 News publication date | Time: 01:46 PM News publication time | Views: 62 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 2 Comments

P
Pranita
08-08-2026 07:24 AM

👍🏻👍🏻

P
Pranita j
07-08-2026 03:25 PM

Good

Write a Comment
0 / 50 words
Advertisement