अमृत पराक्रम दिन स्पर्धांच्या जनजागृतीसाठी सकारात्मक प्रतिसाद देत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
हिंगोली, दि. ७ : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे हिंगोली जिल्हा समन्वयक श्री. बालाजी शिंदे यांनी आज अमृत कार्यालय, हिंगोली येथे सदिच्छा भेट देऊन महाराष्ट्र शासनाच्या 'अमृत' संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या 'अमृत पराक्रम दिन' राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि रिल्स स्पर्धांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.
यावेळी नागरिकांमध्ये आणि विशेषतः युवकांमध्ये अपराजित योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अद्वितीय शौर्य, पराक्रम, युद्धनीती, राष्ट्रनिष्ठा आणि नेतृत्वाची प्रेरणा पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांच्या व्यापक प्रचार-प्रसाराबाबत चर्चा करण्यात आली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या स्वराज्याचा विस्तार, संरक्षण आणि हिंदवी साम्राज्याचा झेंडा उत्तरेपर्यंत दिमाखात फडकविण्याचे ऐतिहासिक कार्य श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी केले. त्यांच्या कार्याचा परिचय नव्या पिढीला व्हावा, या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाच्या 'अमृत' संस्थेच्या वतीने राज्यभर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, प्रत्येक गटासाठी विभागनिहाय आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
या प्रसंगी श्री. बालाजी शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत स्पर्धांचा अधिकाधिक प्रचार करून युवक व नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७१
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment