आमदार डॉ. गुट्टे यांच्या कार्यालयाकडून अमृत संस्थेच्या राज्य व्यवस्थापकांना आश्वासन
गंगाखेड : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांनी २८ डिसेंबर २०२५ रोजी गंगाखेडचे विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. आमदार गुट्टे यांचे स्वीय सहायक अभिजित चक्के या वेळी उपस्थित होते. शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार, तसेच विविध योजनांसाठी लाभार्थी नोंदणी यासाठी ते सक्रिय असतात. त्याचाच एक भाग म्हणून गंगाखेड येथे अमृत माहिती केंद्र सुरू केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. अमृत संस्थेच्या विविध योजना लक्ष्यित गटातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम या केंद्राच्या माध्यमातून केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
अमृत २०२६ या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन अमृत संस्थेचे राज्य समन्वयक दीपक जोशी यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. या वेळी अमृत संस्थेचे परभणी जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे, रवी कुलकर्णी, अमृत संस्थेच्या जीसीसी-टीबीसी योजनेचे लाभार्थी सुमित देशपांडे आदींची उपस्थिती होती.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
अमृत परभणी जिल्हा कार्यालय,
जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला,
बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला, परभणी.
मोबाइल : 7391065473
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment