अमृत पराक्रम दिन’ निमित्ताने आयोजित विविध स्पर्धा व जनजागृती उपक्रमांना शैक्षणिक क्षेत्रातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी बाळासाहेब दीक्षित प्रतिष्ठानचे सचिव मा. श्री. देवेंद्र देवणीकर (दादा) यांची सदिच्छा भेट झाली आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अमृत पराक्रम दिन’ विविध स्पर्धा व जनजागृती उपक्रमांना शैक्षणिक क्षेत्रातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी यांनी बाळासाहेब दीक्षित प्रतिष्ठानचे सचिव मा. श्री. देवेंद्र देवणीकर (दादा) यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान श्री. चिंतेश जोशी यांनी अमृतच्या विविध योजना, विद्यार्थी व युवकांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच अमृत पराक्रम दिनानिमित्त आयोजित निबंध लेखन, वक्तृत्व आणि रील्स निर्मिती स्पर्धांबाबत सविस्तर माहिती दिली. उपक्रमाची माहिती जाणून घेतल्यानंतर मा. श्री. देवेंद्र देवणीकर (दादा) यांनी स्पर्धांचे कौतुक करत संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. तसेच या स्पर्धांचा संदेश अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी शाळांमध्ये व्यापक जनजागृती करण्याचा पुढाकार घेतला असून, मुख्याध्यापक व शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अमृतच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक स्पर्धात्मकतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या सहकार्यामुळे ‘अमृत पराक्रम दिन’ स्पर्धांना व्यापक प्रतिसाद मिळून अधिकाधिक विद्यार्थी या उपक्रमाशी जोडले जातील, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७०
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment