अमृत पराक्रम दिनानिमित्त वेश्वी - अलिबाग येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात निवेदन

अमृत पराक्रम दिनानिमित्त वेश्वी - अलिबाग येथील प्रभाकर एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात निवेदन देण्यात आले

अमृत पराक्रम दिनानिमित्त वेश्वी - अलिबाग येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात निवेदन मुख्य फोटो
अमृत पराक्रम दिनानिमित्त वेश्वी - अलिबाग येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात निवेदन अतिरिक्त फोटो

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा पुढील पिढीपर्यंत नेण्यासाठी १८ ऑगस्ट या त्यांच्या जयंतीनिमित्त अमृत संस्थेतर्फे ' अमृत पराक्रम दिनाचे' साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत १ ते १५ ऑगस्ट दरम्यान निबंध, वक्तृत्व आणि रील/ शॉर्ट्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय,महाविद्यालयीन आणि खुल्या गटातील या स्पर्धेत सहभागी होण्याच्या उद्देशाने वेश्वी - अलिबाग येथील प्रभाकर एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात निवेदन देण्यात आले. रायगड जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक श्री. शैलेश मराठे यांनी हे निवेदन , सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी अमृतची कार्यक्षेत्रे,स्वरूप याविषयीची माहिती सुद्धा देण्यात आली. महाविद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थी वक्तृत्व आणि रील/ शॉर्ट्स सहभागी होतील,असा विश्वास दाखविला आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क - 94238 92182

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 07-08-2026 News publication date | Time: 09:26 AM News publication time | Views: 40 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 07-08-2026 News publication date | Time: 09:26 AM News publication time | Views: 40 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement