अमृत पराक्रम दिनानिमित्त सांगली येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटी शाळेत निवेदन

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अफाट शौर्य, दृढ राष्ट्रनिष्ठा, अजोड युद्धनीती आणि अद्वितीय नेतृत्वाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या 'अमृत' संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स (Reels) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

अमृत पराक्रम दिनानिमित्त सांगली येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटी शाळेत निवेदन   मुख्य फोटो
मुख्य फोटो

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या 'अमृत' संस्थेमार्फत अमृत पराक्रम दिन' निमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या मुख्याध्यापिका यांना देण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या स्वराज्याचा विस्तार, संरक्षण तसेच हिंदवी साम्राज्याचा झेंडा उत्तरेपर्यंत दिमाखात फडकविणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, राष्ट्रनिष्ठा, युद्धनीती आणि नेतृत्वाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या 'अमृत' संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्पर्धेची माहिती, प्रवेशिका सादर करण्याचा कालावधी (१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६), विभागनिहाय बक्षिसे तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका याना देण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे आणि या उपक्रमाचा विद्यालयात व्यापक प्रसार करावा, असे आवाहन अमृत तर्फे यावेळी करण्यात आले. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल मुख्याधिपकानी समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संपर्क : अमृत जिल्हा कार्यालय, अप्पर तहसीलदार कार्यालया समोर, होमगार्ड ऑफिस शेजारी, राजवाडा, सांगली ४१६४१६


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Manoj Mirasdar News publisher name | Date: 06-08-2026 News publication date | Time: 06:13 PM News publication time | Views: 56 Number of times this news has been viewed | District: Sangli Related district of the news
Publisher: Manoj Mirasdar News publisher name | Date: 06-08-2026 News publication date | Time: 06:13 PM News publication time | Views: 56 Number of times this news has been viewed | District: Sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement