अमृत संस्थेच्या वतीने माजलगाव येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) आयोजित करण्यात आले आहे.
माजलगाव, दि. _ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने खुल्या प्रवर्गातील अशा जातींतील, ज्यांच्यासाठी शासनाचा स्वतंत्र विभाग, संस्था किंवा महामंडळाचा लाभ उपलब्ध नाही, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतींना स्वावलंबी उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने माजलगाव येथे ७ ऑगस्ट पासून उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण श्री इन्फोटेक, शाहू नगर, माजलगाव, ता. माजलगाव, जि. बीड येथे आयोजित करण्यात आले असून प्रशिक्षणामध्ये पहिल्या चार दिवसांत प्रत्यक्ष (ऑफलाईन) तर पुढील सहा दिवस ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये व्यवसायाची निवड, उद्योजकीय मानसिकता, व्यवसाय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, बँक कर्ज प्रक्रिया, शासकीय योजना, उद्योग नोंदणी, विपणन, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग, व्यवसाय व्यवस्थापन, ग्राहक संपर्क, व्यवसायातील लेखाजोखा, उद्योगासाठी आवश्यक कागदपत्रे, कच्चा माल उपलब्धता, विक्री व बाजारपेठ विकास आदी विषयांवर तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच CMEGPसह विविध शासकीय योजनांची माहिती, उद्योगासाठी कर्ज मिळविण्याची प्रक्रिया, अनुदानाचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन तसेच अमृतच्या विविध उद्योजकता प्रोत्साहन उपक्रमांची माहितीही प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून, उद्योग सुरू करू इच्छिणारे, व्यवसाय वाढवू इच्छिणारे तसेच स्वावलंबी होण्याची इच्छा असलेल्या युवक-युवतींसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. अधिकाधिक युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत बीड जिल्हा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65468 पत्ता : अमृत संस्थेचे बीड जिल्हा कार्यालय, अथर्व अभ्यासिकेच्या वर, नवगण कॉलेज रोड, वाघ नेत्रालयाशेजारी बीड. 431122 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment