अहिल्यानगरमध्ये अमृत पराक्रम दिनानिमित्त इतिहास तज्ञ आणि अभ्यासक मा.जगन्नाथ लडकत यांचे श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला येथे व्याख्यान संपन्न झाले.
अहिल्यानगर :- महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभरात अमृत पराक्रम दिन' म्हणून साजरा करण्यात येत आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा व राष्ट्रनिष्ठेचा परिचय नवीन पिढीला व्हावा, या उद्देशाने राज्यभरात १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अजिंक्य योद्धा, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या कार्याचापरिचय जनतेला, विशेषतः युवकांना होण्यासाठी म्हणून महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यात व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेल्या आहे. या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात दिनांक ५ ऑगस्ट पासून अहिल्यानगर येथून झाली होती.
आज गुरुवार रोजी सन्माननीय इतिहास अभ्यासक व व्याख्याते मा जगन्नाथ लडकत यांचे "अमृत पराक्रम दिन" निमित्त अपराजित योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांच्या विषयी व पालखेड येथील युद्ध याविषयी "श्री समर्थ विद्यामंदिर प्रशाला"येथे व्याख्यान संपन्न झाले. २०० पेक्षा जास्त विद्यार्थी या व्याख्यानास उपस्थित होते. अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा यांचा जाज्वल्य इतिहास प्रथम सर्वांसमोर आला आणि सर्वांनी समाधान व्यक्त केले.
विशेष म्हणजे अमृत संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी प्रास्ताविक करत अमृत पराक्रम दिन व अमृत संस्थेचे योजना याविषयी माहिती दिली.मुख्याध्यापिका सौ. वसुधा सुनील जोशी यांनी यथोचित सन्मान करून स्वागत केले. यावेळी श्री. अमोल बागुल सर, श्री. विवेक भारताल, कुलकर्णी सर तसेच सौ. कालिंदी केसकर,मा सुनील चाफे,अमृत मित्र वैभव कुलकर्णी व अमृत मित्र सुजल झुंजारे हे उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२८७६९
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment