शालेय विद्यार्थ्यांमध्ये इतिहासप्रसार आणि सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी अमृततर्फे ज्ञानभारती विद्यामंदिरला निवेदन पत्र सादर
नांदेड: विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अपराजित पराक्रमाचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित अमृत पराक्रम दिन राज्यस्तरीय स्पर्धेत' शालेय विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग नोंदवला जावा, याकरिता 'अमृत' संस्थेच्या वतीने विशेष पुढाकार घेण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत ज्ञानभारती विद्यामंदिर शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी व्हावे, यासाठी 'अमृत'चे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी आणि अमृत मित्र श्री. विश्वास बदापुरकर यांनी शाळेला भेट देऊन अधिकृत निवेदन पत्र सादर केले. ज्ञानभारती विद्यामंदिरच्या प्रशासकीय प्रमुख (Administration Head) श्रीमती अंजली जोशी यांनी हे निवेदन पत्र स्वीकारले.
या प्रसंगी बोलताना अमृतच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा राज्यस्तरीय स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक वारशाबद्दल जाणीव-जागृती निर्माण होते, तसेच त्यांच्यातील नेतृत्वगुण आणि स्पर्धात्मकतेला वाव मिळतो.
ज्ञानभारती विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी नेहमीच विविध उपक्रमांत चमकदार कामगिरी केली असून, याही स्पर्धेत त्यांचा मोठा आणि यशस्वी सहभाग राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवेदन स्वीकारल्यानंतर शाळा प्रशासनाच्या वतीने श्रीमती अंजली जोशी यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि या स्पर्धेत त्यांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शाळा पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७२
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment