अमृत पराक्रम दिनानिमित्त राज्यस्तरीय स्पर्धांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर

महाराष्ट्र शासनाच्या 'अमृत' संस्थेमार्फत 'पराक्रम दिन' निमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आली

अमृत पराक्रम दिनानिमित्त राज्यस्तरीय स्पर्धांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर मुख्य फोटो
मुख्य फोटो

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या 'अमृत' संस्थेमार्फत अमृत पराक्रम दिन' निमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या स्वराज्याचा विस्तार, संरक्षण तसेच हिंदवी साम्राज्याचा झेंडा उत्तरेपर्यंत दिमाखात फडकविण्याचे अद्वितीय कार्य श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी केले. त्यांच्या शौर्य, राष्ट्रनिष्ठा, युद्धनीती व नेतृत्वाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या 'अमृत' संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रत्येक गटासाठी विभागनिहाय बक्षिसांची तरतूद करण्यात आली असून सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्याचा कालावधी १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६ असा आहे. यावेळी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेण्यासाठी संबंधित विभागांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त प्रसार करणे आवश्यक आहे. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी उद्युक्त करावे. यासाठी आवश्यक सूचना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबधित शाळांना द्यावी. अशी विनंती अमृत संस्थेतर्फे करण्यात आली. संपर्क : अमृत जिल्हा कार्यालय, अप्पर तहसीलदार कार्यालया समोर, होमगार्ड ऑफिस शेजारी, राजवाडा, सांगली ४१६४१६

संपर्क क्रमांक- ९११२२२८७६६

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

https://mahaamrut.org.in/

Publisher: गौरी कुलकर्णी News publisher name | Date: 06-08-2026 News publication date | Time: 04:10 PM News publication time | Views: 36 Number of times this news has been viewed | District: Sangli Related district of the news
Publisher: गौरी कुलकर्णी News publisher name | Date: 06-08-2026 News publication date | Time: 04:10 PM News publication time | Views: 36 Number of times this news has been viewed | District: Sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement