अकोला येथे अमृत व एमसीडीच्या संयुक्त विद्यमाने ब्युटी पार्लर प्रशिक्षणाची सुरुवात

प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणादरम्यानच ऑर्डर्स घेण्यास सुरुवात केली असून लाभार्थींना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचीही माहिती देण्यात आली.

अकोला येथे  अमृत व एमसीडीच्या संयुक्त विद्यमाने  ब्युटी पार्लर प्रशिक्षणाची सुरुवात मुख्य फोटो
अकोला येथे  अमृत व एमसीडीच्या संयुक्त विद्यमाने  ब्युटी पार्लर प्रशिक्षणाची सुरुवात अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) व एमसीईडी यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या ब्युटी पार्लर प्रशिक्षण केंद्राला नुकतीच भेट देण्यात आली. प्रशिक्षणाचा आढावा घेतला. यावेळी प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष दिले जाणारे प्रशिक्षण, त्यांची प्रगती तसेच प्रशिक्षणाची गुणवत्ता याची सविस्तर शहानिशाही करण्यात आली. प्रशिक्षणार्थींशी संवाद साधताना त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या तसेच प्रशिक्षणातून मिळणाऱ्या कौशल्यांचा भविष्यात कसा उपयोग होईल, याबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थींनी समाधान व्यक्त करत सांगितले की, या प्रशिक्षणामुळे त्यांना ब्युटी पार्लर क्षेत्रातील विविध तंत्रे आत्मसात करता आली असून आता त्यांना प्रत्यक्ष काम करण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. यावेळी अनेक लाभार्थ्यांनी सांगितले की, प्रशिक्षणादरम्यानच त्यांनी ब्युटी पार्लरच्या सेवांसाठी ऑर्डर्स घेण्यास सुरुवात केली असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा निर्धार आहे. या प्रशिक्षणामुळे त्यांना स्वयंरोजगाराची नवी दिशा मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी उपस्थित लाभार्थींना अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. योजनेचा लाभ, पात्रता व अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित महिलांनी या योजनेबद्दल उत्सुकता व्यक्त करत लाभ घेण्याची तयारी दर्शविली. अमृत व एमसीईडी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून राबविण्यात येणारे हे प्रशिक्षण महिलांना कौशल्याधारित शिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत असून, अशा उपक्रमांमुळे अनेक महिलांना स्वावलंबनाचा मार्ग खुला होत आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२७६३६


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Prachi Deo News publisher name | Date: 06-08-2026 News publication date | Time: 03:36 PM News publication time | Views: 1,224 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news
Publisher: Prachi Deo News publisher name | Date: 06-08-2026 News publication date | Time: 03:36 PM News publication time | Views: 1,224 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement