महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)' च्या वतीने आयोजित अमृत पराक्रम दिन निमित्ताने राज्यस्तरीय रिल्स, निबंध व वक्तृत्व स्पर्धेत आय.टी.आय च्या विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चित करण्यासाठी 'अमृत' कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. अमृत नांदेडचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सौरभ माळहिप्परगेकर व उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी यांनी औ.प्र.सं. (ITI) नांदेड जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेऊन स्पर्धेचे अधिकृत निवेदन सुपूर्द केले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तरुणांसाठी 'अमृत'तर्फे राज्यस्तरीय स्पर्धा; आय.टी.आय जिल्हा अधिकाऱ्यांना दिले निवेदन
नांदेड:
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)' च्या वतीने आयोजित "अमृत पराक्रम दिन निमित्ताने राज्यस्तरीय रिल्स, निबंध व वक्तृत्व स्पर्धेतआय.टी.आय च्या विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चित करण्यासाठी 'अमृत' कार्यालयाने पुढाकार घेतला आहे.
अमृत नांदेडचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सौरभ माळहिप्परगेकर व उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी यांनी औ.प्र.सं. (आय.टी.आय) नांदेड जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेऊन स्पर्धेचे अधिकृत निवेदन सुपूर्द केले.
तरुणांमध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्या राष्ट्रनिष्ठा, नेतृत्व आणि युद्धनीतीचा इतिहास रुजवणारा हा उपक्रम आहे. ही स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या अशा ३ गटांमध्ये घेतली जात असून, ITI मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वक्तृत्व, निबंधासोबतच आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'रिल्स' स्पर्धेचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व गटांतील विजेत्यांना विभागनिहाय आकर्षक रोख रक्कमेची पारितोषिके व सन्मानचिन्हे दिली जातील. जिल्ह्यातील ITI मधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७२
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment