महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)' नांदेड कार्यालयाकडून अमृत पराक्रम दिनानिमित्त अपराजित योद्धा – थोरले बाजीराव पेशवे' यांच्या कर्तृत्वावर राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासठी मा. जिल्हा शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन स्पर्धेच्या माहितीचे अधिकृत निवेदन दिले.
अमृत पराक्रम दिनानिमित्त श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या कर्तृत्वावर आधारीत राज्यस्तरीय स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी 'अमृत'तर्फे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
नांदेड: महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)' नांदेड कार्यालयाकडून अमृत पराक्रम दिन या राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला जावा, यासाठी अमृत नांदेड कार्यालयाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सौरभ माळहिप्परगेकर व उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी यांनी मा. जिल्हा शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन स्पर्धेच्या माहितीचे अधिकृत निवेदन दिले.
थोरले बाजीराव पेशवे यांचा पराक्रम, नेतृत्व, संघटन कौशल्य, युद्धनीती आणि राष्ट्रनिष्ठेचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन आणि सर्वसामान्यांसाठी खुला अशा तीन वेगवेगळ्या गटांत आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील विजेत्यांसाठी विभागनिहाय आकर्षक रोख बक्षिसे व सन्मानचिन्हे दिली जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांनी या स्पर्धेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७२
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment