आरीवर्क प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना मिळाला उद्योजकतेचा कानमंत्र

अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांनी प्रशिक्षणस्थळी भेट देऊन साधला संवाद

आरीवर्क प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना मिळाला उद्योजकतेचा कानमंत्र मुख्य फोटो
आरीवर्क प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना मिळाला उद्योजकतेचा कानमंत्र अतिरिक्त फोटो

गंगाखेड : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे आरीवर्क प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांनी २८ डिसेंबर २०२५ रोजी या प्रशिक्षणस्थळी भेट देऊन आढावा घेतला. या वेळी त्यांनी प्रशिक्षणार्थी महिलांशी संवाद साधला. यशस्वी उद्योजिका होऊन स्वावलंबी होण्यासाठीचा कानमंत्र त्यांनी महिलांना दिला. महिलांनीदेखील या प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

अमृत परभणी जिल्हा कार्यालय,
जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला,
बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला, परभणी.
मोबाइल : 7391065473

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 28-12-2025 News publication date | Time: 02:24 PM News publication time | Views: 148 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 28-12-2025 News publication date | Time: 02:24 PM News publication time | Views: 148 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words