नांदेड येथे अमृत पराक्रम दिन स्पर्धांसंदर्भात गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

अमृत पराक्रम दिन राज्यस्तरीय स्पर्धा: 'अमृत' नांदेड टीमने गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन

  नांदेड येथे अमृत पराक्रम दिन स्पर्धांसंदर्भात गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन मुख्य फोटो
मुख्य फोटो

नांदेड: 'महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)' नांदेड कार्यालयाद्वारे आयोजित "अमृत पराक्रम दिन" राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि रिल्स स्पर्धेच्या प्रसारासाठी अमृतच्या प्रतिनिधींनी गट शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

हे निवेदन अमृत नांदेडचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सौरभ माळहिप्परगेकर आणि उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी यांनी प्रत्यक्ष भेटून सुपूर्द केले.

​तालुकास्तरावरील सर्व शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत या स्पर्धेची माहिती पोहोचावी आणि त्यांनी यात उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा, ही या भेटीमागील मुख्य भूमिका होती.

थोरल्या बाजीराव पेशवयांची युद्धनीती, पराक्रम व संघटन कौशल्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी ही स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन आणि खुला अशा ३ गटांत होणार आहे. प्रत्येक गटातील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरवले जाईल. तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७२


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/





Publisher: Saurabh Kulkarni News publisher name | Date: 06-08-2026 News publication date | Time: 02:04 PM News publication time | Views: 36 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news
Publisher: Saurabh Kulkarni News publisher name | Date: 06-08-2026 News publication date | Time: 02:04 PM News publication time | Views: 36 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement