अमृत कार्यालय लातूर येथे दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी 'अमृत उद्योग कौशल्यवर्धन' (Entrepreneurship Development Program - EDP) या दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला.
लातूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने अमृत कार्यालय लातूर येथे दिनक ६ ऑगस्ट २०२६ रोजी 'अमृत उद्योग कौशल्यवर्धन' (Entrepreneurship Development Program - EDP) या दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला.
या प्रशिक्षणामध्ये पहिले ४ दिवस प्रत्यक्ष (ऑफलाईन) प्रशिक्षण तर पुढील ६ दिवस ऑनलाईन व्हिडिओ सत्रांद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या दहा दिवसीय प्रशिक्षणातून नवीन उद्योग कसा सुरू करावा? अस्तित्वातील उद्योगाचा विस्तार (Scale-up) कसा करावा? आर्थिक नियोजन, बँक कर्ज प्रक्रिया, व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग,अमृत संस्थेच्या माध्यमातून झालेले उद्योजक सत्र व तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे.
उद्घाटन प्रसंगी श्री.ओमकर शेटे ( विभागीय उपव्यवस्थापक -मराठवाडा विभाग ), श्री.श्रीकांत बाहेती (उद्योजक), श्याम सुंदर (प्रशिक्षक)श्री.शुभम मुळजकर (जिल्हा व्यवस्थापक,लातूर) हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मान्यवर श्री श्याम सुंदर सर यांनी उद्योजकीय मानसिकता ,उद्योगाची निवड ,स्थानिक मार्केट धोरण कसे असावे ,ब्रंडिंग ,मार्केटिंग ,सोशल मीडिया ,प्रॉडक्ट डिझाईन आदि उद्योजकतेच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शुभम मुळजकर यांनी केले, तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी ,अमृत मित्र अमित पांडे यांनी केले.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७०
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment