परभणीत ड्रोन पायलट प्रशिक्षणाला लवकरच प्रारंभ- ड्रोन कौशल्यातून उद्योजकतेकडे वाटचाल

परभणी : आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने परभणी येथे लवकरच ड्रोन पायलट प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे.

 परभणीत ड्रोन पायलट प्रशिक्षणाला लवकरच प्रारंभ- ड्रोन कौशल्यातून उद्योजकतेकडे वाटचाल मुख्य फोटो
मुख्य फोटो

परभणी : आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने परभणी येथे लवकरच ड्रोन पायलट प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील युवकांना शेती फवारणी , जमीन मोजणी सर्वेक्षण, बांधकाम, फोटोग्राफी नैसर्गिक आपत्ती सर्वेक्षण, इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण देवून औद्योगिक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

यापूर्वी या प्रशिक्षणांतर्गत परभणी जिल्ह्यातील २० लाभार्थींनी ड्रोन पायलट प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले असून, त्यापैकी ६ जणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून यशस्वी उद्योजकतेकडे वाटचाल केली आहे. त्यामुळे या प्रशिक्षणाची उपयुक्तता आणि रोजगारनिर्मितीची क्षमता सिद्ध झाली आहे.

ड्रोन तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता प्रशिक्षित ड्रोन पायलटची मागणी सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परभणीत सुरू होणारे प्रशिक्षण युवकांसाठी सुवर्णसंधी ठरणार असून, अधिकाधिक पात्र इच्छुकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी केले आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७३


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 06-08-2026 News publication date | Time: 11:34 AM News publication time | Views: 130 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 06-08-2026 News publication date | Time: 11:34 AM News publication time | Views: 130 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement