कोपरगाव येथे "अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम" प्रशिक्षणाची सुरुवात

कोपरगाव येथे "अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम" प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे.योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने लाभार्थ्यांनी व्यक्त केले समाधान.

कोपरगाव येथे "अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम" प्रशिक्षणाची सुरुवात मुख्य फोटो
मुख्य फोटो

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील अमृत उद्योजकता विकास कार्यक्रमाचे उदघाटन मा. मकरंद कोऱ्हाळकर (अध्यक्ष -ब्राह्मण संघ )यांच्या हस्ते व जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

प्रशिक्षणाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली.मा श्रीराम जोशी सर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.

अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षणाच्या उदघाटन प्रसंगी अमृत मित्र संदीप देशपांडे यांनी प्रस्ताविक केले.जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी अमृत पेठ थेट बाजारपेठ,ई कॉमर्स प्लॅटफॉर्म, व्याज परतावा योजना तसेच इतर योजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

अमृत संस्थे मुळे हे प्रशिक्षण मिळत असल्याने लाभार्थी यांनी समाधान व्यक्त केले. या प्रशिक्षणात एकूण १४ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. हे प्रशिक्षण एकूण १० दिवसीय असणार आहे.


अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769

जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 05-08-2026 News publication date | Time: 11:00 PM News publication time | Views: 34 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 05-08-2026 News publication date | Time: 11:00 PM News publication time | Views: 34 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement