अमृत संस्थेतर्फे श्रीमंत बाजीराव पेशवे पराक्रम दिनाबाबत जनजागृती; महिलांनी सहभाग घ्यावा व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन
सांगली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या अमृत पराक्रम दिन उपक्रमाची माहिती ब्राह्मण महिला मंडळ सदस्य महिलांना देण्यात आली. या जनजागृती कार्यक्रमात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे अद्वितीय शौर्य, नेतृत्व, राष्ट्रनिष्ठा आणि त्यांच्या पराक्रमाचे ऐतिहासिक महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी उपस्थित महिलांना पराक्रम दिन उपक्रमामागील उद्देश समजावून सांगण्यात आला. तसेच आपल्या इतिहासातील महान योद्ध्यांच्या कार्याची प्रेरणा समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. अमृत संस्थेच्या प्रतिनिधींनी महिलांना अमृत पराक्रम दिन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले. महिलांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याची तयारी दर्शविली.
त्याच प्रमाणे उपस्थित महिलांना अमृत संस्थेच्या कार्याची व विविध योजनांची माहिती देण्यात आली. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी तसेच उद्योजकांसाठी असलेल्या उद्योजकात प्रशिक्षण कार्यक्रम , इतर प्रशिक्षण कार्यक्रम, व्याज परतावा योजना यांची माहिती देण्यात आली. तसेच अमृत EV चार्जिंग स्टेशन, अमृत घन कचरा व्यवस्थापन या नवीन व्यवसायिक संधींबद्दल चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे अमृत संस्थेच्या कामाबद्दल व योजनांबद्दल माहिती जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत पोचवण्याचे आवाहन उपस्थित महिलांना करण्यात आले. बऱ्याच महिलांनी अमृत सखी म्हणून स्वयंप्रेरणेने अमृत संस्साथेसाठी काम करण्याची तयारी दर्शवली आहे. अमृत संस्थेतर्फे शैलेन्द्र जहागिरदार व अमृत सखी गौरी कुलकर्णी यांनी योजनांची माहिती दिली. या प्रसंगी ब्राह्मण महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ सुलभा ताम्हणकर, उपाध्यक्ष श्रीमती अंजली खाडीलकर व सामाजिक कार्यकर्त्या कार्यकारिणी सदस्या सौ. कल्याणी खाडीलकर उपस्थित होत्या. अमृतच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांच्यातर्फे करण्यात आले.
अधिक माहिती साठी संपर्क:- महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी(अमृत), सांगली जिल्हा कार्यालय, अप्पर तहसील कार्यालया समोर, राजवाडा, सांगली 416416 जिल्हा कार्यालय:-9112228766
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment